मी Notice Period शिवाय काम सोडतोय, मला अटक होईल का?

तुम्ही कुठलीही कंपनी जॉईन करण्याआधी तुम्हाला ऑफर लेटर दिलं जातं. या ऑफर लेटरमध्ये तुमच्या पगाराच्या तपशीलासह कंपनीचे नियम आणि अटी दिलेल्या असतात.


आजकाल सगळ्या कंपन्यांमध्ये एमप्लॉई फ्रेंडली वातावरण असतं. एमप्लॉईजला काम करताना आनंद मिळावा, सुरक्षित वाटावं म्हणून अनेक कंपनी पॉलिसी लागू केल्या जातात. मात्र या पॉलिसीचा एक भाग म्हणजे नोटीस पिरेडचा जो नियम टाकला जातो, तो कित्येकांना गैरसोयीचा वाटतो. पण या नियमांचं पालन करणं तुमच्याच फायद्याचं ठरतं. आपल्या देशासह, इतर काही देशांमधल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला एक्सपिरिअन्स आणि रिलिव्हींग लेटर देणं आवश्यक असतं. हे लेटर म्हणजे आधीच्या कंपनीत तुम्ही कायदे आणि नियम पाळून काम केल्याचा पुरावा असतो.

तुम्ही कुठलीही कंपनी जॉईन करण्याआधी तुम्हाला ऑफर लेटर दिलं जातं. या ऑफर लेटरमध्ये तुमच्या पगाराच्या तपशीलासह कंपनीचे नियम आणि अटी दिलेल्या असतात. यामध्येच तुम्ही नोकरी सोडण्याआधी तुम्हाला किती दिवसांचा, महिन्यांचा नोटीस पिरिअड सर्व्ह करावा लागेल हे नमूद केलं असतं.

Source: bhgrlaw.com

या ऑफर लेटरवर तुमची आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली जाते. एकदा का तुम्ही ऑफर लेटरवर स्वाक्षरी केली की तुम्हाला त्या अटींचं पालन करावंच लागतं. नाहीतर तुमच्यावर संबंधीत कंपनी कायदेशीर कारवाई करु शकते.

तुम्ही नोटीस पिरिअड सर्व्ह नाही केला तर?

तुम्ही नोटीस पिरिअड सर्व्ह केला नाही तर तुमच्या खिशाला चांगलाच भूर्दंड बसू शकतो. कारण साधारणतः भारतीय कंपन्यांमध्ये ९० दिवसांचा नोटीस पिरिअड सर्व्ह करणं बंधनकारक असतं. कंपनीने तुमच्या ऑफर लेटरमध्ये एक क्लॉज टाकला असतो की ९० दिवसांचा नोटीस पिरिअड पुर्ण करा किंवा तुमच्या ३ महिन्यांचा एकूण पगार कंपनीला देऊन, तुम्ही कंपनी सोडून जा.

जर तुम्ही तुमचा हा नोटीस पिरिअड पूर्ण करण्याऐवजी कंपनीला ३ महिन्यांच्या पगार दिला तर कंपनी कुठलाच आक्षेप न घेता तुम्हाला रिलिव्हींग आणि एक्सपिरिअन्स लेटर देऊन मोकळं करतात. मात्र जर तुम्ही पैसे न भरता आणि नोटीस पिरिअड पूर्ण न करता नोकरी सोडली तर संबंधित कंपनी तुमचं रिलिव्हींग –एक्सपिरिअन्स लेटर अडवून ठेवतात. परिणामी तुम्हाला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळण्यास अडचण येऊ शकते.

कंपनीला कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग सुद्धा खुला असतो. पण त्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ पाहता सहसा कमी पगाराच्या एमप्लॉईजवर कंपन्या अशा कारवाया सहसा करत नाही. पण हि हायर लेव्हलच्या एमप्लॉईज बाबत कंपनी कायदेशीर दावा ठोकू शकते.

तुम्ही खरंच तुमच्या कामात कौशल्यपूर्ण असाल आणि तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीची तुम्हाला तगडी ऑफर असेल. परंतू ती कंपनी तुम्हाला लागलीच रुजू व्हायला सांगत असेल, तर काय कराल? तीन महिन्यांचा पगार आधीच्या कंपनीला स्वतःच्या खिशातून देणं प्रॅक्टिकल नाही. प्रत्येकालाच परवडेल असंही नाही. अशावेळी तुम्हाला चालून आलेल्या संधीवर पाणी सोडावं लागेल? तर असं अजिबात नाही.

तुम्ही जर खरंच तुमच्या कामात चोख असाल, आणि समोरच्या कंपनीला तुमची तातडीने गरज असेल तर समोरची कंपनी तुमचा नोटीस पिरिअड विकत घेऊ शकते.

कसंल भारी ना? म्हणजे तुम्हाला नवी संधी ही मिळेल आणि आधीच्या कंपनीला तोटा न होता नियमांची पूर्तताही होते.

आजकाल परत कंपनींच्या पॉलिसी बदलल्या आहेत. आता सर्व एमप्लॉईजला ३ महिन्यांचा नोटीस पिरिअड सर्व्ह करणं सोयीचं नाही म्हणून बऱ्याच कंपन्यांनी नोटीस पिरिअडचा कार्यकाळ ९० दिवसांवरुन ३० दिवस किंवा १५ दिवसांपर्यंत केला. त्यामुळे काळजी करू नका . इतक्या कमी कालावधीसाठी तुमच्या करिअरला खीळ बसवू देऊ नका…!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *