भारताचे पहिले आर्मी चीफ ज्यांना पंतप्रधान पंडित नेहरू खूप घाबरायचे, कारण……

करिअप्पा यांनी आपल्या ३ दशकांच्या करिअर मध्ये अनेक सन्मान मिळाले आणि अनेक पदे भूषवली. त्यांनी जुनिअर ऑफिसर म्हणून सुरुवात केली.


कोडंडेरा मडप्पा करिअप्पा. होय ह्यांनाच घाबरायचे पंडित नेहरू. पण कोण होते हे करिअप्पा? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर स्वतंत्र भारतीय सेनेची कमान ज्यांनी सांभाळली ते ‘फिल्ड मार्शल के एम करिअप्पा’. भारतीय सेनेचे प्रथम कमांडर इन चीफ!

फिल्ड मार्शल कोडंडेरा मडप्पा करिअप्पा यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ मध्ये कर्नाटकातील शनिवारासंथे, कूर्ग प्रांतात म्हणजे आताच्या कोडागु जिल्हात झाला होता. कोडावा जातीच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण त्यांचे बाबा मडप्पा हे महसूल विभागात कामाला होते. करिअप्पा यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या.

करीअप्पांचे घरात लाडाचे नाव होते ‘चिम्मा’. १९१७ मध्ये माडिकेरी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते चेन्नईला प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये गेले. कॉलेज मध्ये असताना त्यांना कळले कि भारतीय सैन्यात ऑफिसर पदासाठी भरती चालू आहे. त्यांनी अर्ज केला. ७० कॅन्डिडेट्स मधून ज्या ४२ जणांची निवड झाली त्यातील एक होते करिअप्पा. इंदोर येथील डयली कॅडेट कॉलेज येथून सैनिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९१९ मध्ये ब्रिटिश सेनेत ते जुनिअर अधिकारी म्हणून रुजू झाले. प्रथम कार्नाटिक इंफ्रन्टरी मग नेपियर रायफल्स त्या नंतर डोग्रा आणि शेवटी १९२३ मध्ये राजपूत हि त्यांची पेरीमेंट होम रेजिमेंट ठरली. 

सेनेत भरती झाल्यानंतर त्यांच्या यशाचा ध्वज उंचच उंच फडकू लागला. १९२७ मध्ये ते कॅप्टन झाले आणि १२३८ मध्ये मेजर. करिअप्पा यांनी दुसऱ्या महायुद्धात सुद्धा भाग घेतला. ब्रिगेड मेजर म्हणून त्यांची नेमणुक देराजात, पाकिस्तान येथे झाली होती. त्यानंतर इराक, इराण, सीरिया आणि बर्मा येथे युद्धात भाग घेतला.

ब्रिटिश सैन्यात स्वतंत्र युनिट सांभाळणारे ते प्रथम भारतीय अधिकारी होते. १९४७ साली पश्चिमी सीमेवर झालेल्या भारत-पाक युद्धाचे नेतृत्व करिअप्पा यांनीच केले होते.

करिअप्पा यांनी आपल्या ३ दशकांच्या करिअर मध्ये अनेक सन्मान मिळाले आणि त्यांनी अनेक पदे भूषवली. त्यांनी जुनिअर ऑफिसर म्हणून सुरुवात केली आणि फील्ड मार्शल या उच्च पदापर्यंत पोहोचले. दुसऱ्या महायुद्धात बर्मा फ्रंट वर जपानी सेनेविरुद्ध केलेल्या पराक्रमाबद्दल ब्रिटिश सरकारने १९४५ मध्ये Order of the British Empire (OBE) म्हणून त्यांना सन्मानित केले. अमेरिकन राष्ट्रपति हैरी एस. ट्रूमैन यांनी त्यांना ‘Order of the Chief Commander of the Legion of Merit’  ह्या पदवीने सन्मानित केले.

स्वतंत्र भारतीय सेनेचे प्रथम कमांडर इन चीफ आणि १९८६ मध्ये भारत सरकारने त्यांना फिल्ड मार्शल म्हणून गौरवले  १९५३ मध्ये करिअप्पा रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा भारत सरकारला आणि सेनेला सहयोग देत राहिले. भारत सरकार तर्फे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांनी हाय कमिशनर म्हणून काम केले.  

करिअप्पा ह्यांचे पुत्र रिटायर्ड एअर मार्शल के सी नंदा करिअप्पा ह्यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकात ते सांगतात की पंडित नेहरू यांना वडील करिअप्पा ह्यांची भीती वाटत असे. करिअप्पा लष्करी बंड करून सत्ता पालट करतील अशी भीती पंडित नेहरूंना वाटत असे. ते पुढे लिहितात कि पंडित नेहरूंची हि भीती निष्कारण होती कारण करिअप्पा हे पंडित नेहरू आणि इंडिया गांधी यांना सदैव सहयोग करत असत आणि त्त्या दोघांशी त्यांचे चांगले संबंध होते.

मित्रांनो, तुम्हाला भारतीय सैन्य दिन हा दर १५ जानेवारीला येतो हे माहित असेलच, पण हाच दिवस का? माहित आहे? कारण १५ जानेवारी १९४९ ह्याच दिवशी के एम करिअप्पा यांनी भारतीय सेनेत जनरल पद ग्रहण केले. हाच दिवस ‘सैन्य दिन’ म्हणून घोषित करण्यात आला, कारण तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय सैन्य तयार झाले होते.


One Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sushant Tambe