रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला, पण हा कृष्णजन्मभूमीचा वाद काय आहे?

रामजन्मभूमीचा निकाल आपल्या बाजूने लागल्याने अयोध्येनंतर आता मथुरा मुक्त करायची असा नारा दिला जात आहे.


अयोध्येचे राम मंदिर व बाबरी मशीद आणि त्या निमित्त झालेली दंगल सर्वांनाच ज्ञात आहे. रामभक्तांच्या कित्येक वर्षांच्या प्रतिज्ञेनंतर आता भव्य दिव्य राम मंदिरही उभारले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का? रामजन्मभूमी प्रमाणे कृष्णजन्मभूमीचा वाद देखील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा हिंदुत्ववाद्यांनी लावून धरल्याने कुठेतरी कृष्णजन्मभूमीचा मुद्दा झाकोळला. पण रामजन्मभूमीचा निकाल आपल्या बाजूने लागल्याने अयोध्येनंतर आता मथुरा मुक्त करायची असा नारा दिला जात आहे.

Source : scroll.in

कंसाच्या कारागृहात कृष्णाचा जन्म झाला त्या जागेवर सध्या एक मशिद उभी आहे. पूर्वी तिकडे एक मंदिर होते मात्र ते उध्वस्त करुन तिथे ही मशिद उभारण्यात आली आणि वाद सुरू झाला. भारतातलेच नाही तर जगभरातले कृष्ण भक्त गेली अनेक शतके न्याय मिळण्यासाठी वाट पाहत आहेत. ही कृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भक्तांनी न्यायालयात दाद मागितली आहे. पण नेमका कृष्णजन्मभूमीचा इतिहास काय आहे आणि न्यायालयात नेमकी काय दाद मागितली जात आहे?हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी मथुरेचा इतिहास आपल्याला काय सांगतो ते पाहूया.

इसवी सन पूर्व ८० मध्ये भरतपूर्व नरेशाचे पूर्वज असलेला यदुवंशी राजा ब्रजनाम यांनी पहिल्यांदा येथे श्रीकष्णाचे भव्य दिव्य असे मंदिर उभारले. त्यानंतर वेगवेगळ्या शत्रुंनी मथुरेवर हल्ला केला आणि मंदिर नष्ट केले. त्यानंतर इसवी सन ४०० मध्ये गुप्त राजवटीमध्ये चंद्रगुप्त विक्रमादित्य यांनी नव्याने भव्य मंदिराची उभारणी केली.

पण महमूद गझवीने या मंदिरावर हल्ला करुन ते नष्ट केले. त्यानंतर महाराज विजयपाल देव तोमर यांच्या काळात हिंदू जाट शासक जाजन सिंह यांनी इसवी सन ११५० मध्ये तिसऱ्यांदा श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराची पुर्नबांधणी केली. मात्र १६ व्या शतकात मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला झाला. सिकंदर लोधीने परत एकदा मंदिर उद्ध्वस्त केले. पण जाचाला जुमानतील ते कृष्ण भक्त थोडीच? इसवी सन १६१८ साली पुन्हा एकदा म्हणजेच चौथ्यांदा भव्य कृष्ण मंदिराची बांधणी झाली. असे म्हणतात की ओरछाचे बुंदेल राजा वीरसिंह जूदेव यांनी हे मंदिर इतके भव्य दिव्य बांधले की, चक्क आग्र्यातूनही या मंदिराचा कळस दिसे आणि म्हणूनच की काय मुगल शासक बादशहा औरंगजेबाला हे पाहावले नाही आणि त्याच्याच आदेशानुसार १६६९ला पुन्हा एकदा मंदिरावर हल्ला झाला आणि मंदिर नष्ट केले गेले. हे मंदिर वाचविण्यासाठी वीर गौकुला जाट यांनी कसोशीने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला होता.

Source : newstrack.com

मुघल कमकुवत झाल्यानंतर जाट शासक सूरजमल यांनी पुन्हा एकदा श्रीकृष्ण मंदिराची उभारणी केली. पुढे याच मंदिराचा विस्तार महाराज जवाहर सिंह यांनी केला. त्यानंतर २१ फेब्रुवारी १९५१ रोजी बिर्ला यांच्या पुढाकाराने कृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर न्यायालयात काही मुद्द्यांबाबत दाद मागण्यात आली. अखेर ट्रस्टला मंदिराचा गाभारा आणि भव्य भागवत भवन यांचा जीर्णोध्दार करण्याची परवानगी मिळाली आणि १९८२ साली जीर्णोध्दाराचे काम पूर्णत्त्वास आले. ट्रस्ट स्थापन होण्याआधी या मंदिराबाबतचे सर्व अधिकार भरतपूर नरेश यांच्या कुटुंबियांकडे होते.

हा झाला मंदिराचा इतिहास. आता न्यायालयात नेमका काय वाद सुरू आहे हे जाणून घेऊ या. जेव्हा औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केले होते तेव्हा तिथे त्याने शाही ईदगाह मशिद बांधली. आता ही मशिद कृष्णजन्मभूमीच्या हद्दीत येते असा श्रीकृष्णभक्तांचा आक्षेप आहे. म्हणून लखनऊमधील रंजना अग्निहोत्री, त्रिपुरारी त्रिपाठी, सिद्धार्थ नगरचे राजेश मणि त्रिपाठी, दिल्लीचे प्रवेश कुमार, करुणेश कुमार शुक्ला आणि शिवाजी सिंह यांनी कृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आपल्याला मिळावी अशी न्यालयाकडे दाद मागितली आहे.

मथुरेतील १३.३७ एकरचा परिसर ही श्रीकृष्णाची जन्मभूमी असून कट्टर इस्लामी असलेल्या औरंगजेबाच्या आदेशावरून १६६९ -७० दरम्यान मंदिर उद्ध्वस्त करुन याच भागात मशिद बांधली आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळेच या श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमण हटवावे व तिथे असलेले बांधकामही हटवावे अशी मागणी न्यायालयात केली जात आहे.

भगवान राम असो वा श्रीकृष्ण त्यांना कलियुगातही न्यायासाठी लढावे लागले. असे म्हणतात विष्णूचा श्रीकृष्णावतार हा त्याच्या उच्चारा इतकाच जगण्यास कठीण होता. कृष्ण हा धर्म स्थापन व्हावा यासाठीच लढला, धर्म हा न्याय आणि प्रेमातूनच साधता येतो ही शिकवण त्याने गीतेतून दिली. पण कृष्णाचा तो लढा महाभारतामध्येच संपला नाही तर तो अजूनही सुरूच आहे. तो अजूनही लढतोय..


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *