रेल्वेचे रूळ कधीच का गंजत नाहीत? यामागे आहे विज्ञानाची जादू!

साध्या तव्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर जरा पाणी लागले रे लागले कि तो गंजतो, हो ना? मग रेल्वेचे रुळ नेहमीच चकाकणारे कसे?


रेल्वेने प्रवास करण्यात एक वेगळीच मज्जा असते नाही? अगदी लहानपणापासूनच आपली आणि त्या झुकू झुकू गाडीची छान गट्टी जमलेली असते. मुंबई सारख्या शहरातल्या नागरिकांसाठी तर रेल्वे म्हणजे त्यांची जीवन वाहिनी, त्यांची सखीच असते. मात्र रेल्वे ज्या रुळांवरुन चालते त्याबाबतची एक खासियत माहीत आहे का तुम्हाला? ऊन, वारा, पाऊस यांना झेलत, भारतभर सर्वदूर पसरलेले हे रुळांचे जाळे कायम चकाकणारे आणि ताजे तवाने भासते नाही का? पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की या रुळांवर गंज का बरे चढत नसावा? नाही तर आपल्या घरातल्या लोखंडी वस्तूंचेच पहा ना.. साध्या तव्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर जरा पाणी लागले रे लागले कि तो गंजतो, हो ना? मग रेल्वेचे रुळ नेहमीच चकाकणारे कसे? हो आज आपण या लेखातून याबाबतच जाणून घेणार आहोत.

मुळात लोखंड म्हणजे एक मजबूत धातू पण त्यावर गंज का लागतो, याबाबत जाणून घेऊ. लोखंडाचा संपर्क पाण्याशी, हवेतील आद्रतेशी किंवा ऑक्सिजनशी झाला तर त्याच्यावर लालसर रंगाचा थर म्हणजेच आयर्न ऑक्साइडचा (Iron oxide) थर जमा होतो आणि हळू हळू लोखंडाची झीज व्हायला सुरुवात होते. मग ती लोखंडी वस्तू कितीही मजबूत असो ती कालांतराने खराबच होते. यालाच लोखंडावर गंज चढणे असे आपण म्हणतो.

आता रेल्वेच्या रुळांबाबत बोलायचे झाले तर ते बारा महिने १८ काळ सतत उन, वारा, पाऊस याचा सामना करतात. पण तरीही रुळांवर त्याचा काही परिणाम होत नाही. आता काहीजण म्हणतील की रेल्वे जेव्हा रुळांवरुन जाते तेव्हा घर्षण निर्माण होते आणि त्यामुळेच रुळ कायम पॉलिश केल्याप्रमाणे चकाकत राहतात. आता तुम्हाला वाटेल की हा लावलेला तर्क बरोबरच असावा.. तर असे अजिबात नाही… हे सुद्धा उत्तर साफ चुकीचे आहे.

Source : ytimg.com

रेल्वे रुळ बनविण्यासाठी खास प्रकारच्या स्टीलचा वापर केला जातो. या स्टीलमध्ये मॅंगलोई मिसळून रेल्वेचे रुळ तयार केले जातात. स्टील आणि मॅंगलोईच्या मिश्रणाला मॅंगनीज स्टील असे म्हणतात. यामध्ये १२ टक्के मॅंगनीज तर एक टक्का कार्बन मिल असते. आणि त्याच मुळे रुळांवर गंज चढत नाही.

रेल्वेचे रुळ जर सामान्य लोखंडापासून म्हणजेच आपण वापरतो त्या लोखंडापासून बनवले असते तर त्यावर गंज चढून रेल्वे रुळ लवकरच कमकूवत आणि निकामी झाले असते. त्यामुळे वारंवार रुळ बदलावे तर लागलेच असते त्याच बरोबर रेल्वे अपघाताची टांगती तलवार सतत डोक्यावर राहिली असती. आणि म्हणूनच रेल्वेरुळांसाठी मॅंगनीज स्टील या खास धातूचा वापर होतो.

आलं न यामागचं लॉजिक लक्षात? तर मग हा लेख इतरांसोबत शेअर करून त्यांना सुद्धा जरा ज्ञानवर्धक माहिती द्या कि!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *